Tuesday, July 23 2019 10:55 am

राज्यात प्लास्टिकबंदी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा

मुंबई: पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अखेर राज्यात प्लास्टिक बंदी ची घोषणा  शुक्रवारी विधानसभेत केली आहे.प्लास्टिक विक्री करण्यांऱ्यासोबत वापरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल.टप्प्याटप्प्याने राजभरात प्लास्टिक बंदी करण्यात येईल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्लास्टिक बंदीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती मात्र आज घोषणा करण्यात आली.

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी एक्सपर्ट कमिटी नेमण्यात येणार असून एमपॉवर्ड कमिटीची स्थापना लवकरच करण्यात येईल असे रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केली. प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे प्लास्टिक विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्या अशा दोघांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद असेल.प्लास्टिक पिशव्या, ताटं, चमचे, टोप्या तसेच अनेक प्लास्टिक च्या वस्तुंवर बंदी घालण्यात आली आहे मात्रा पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्यात आलेली नाही

Tags: