Saturday, January 23 2021 1:18 pm

राज्यात कोरोनाचे २६ नवे रुग्ण,एकूण आकडा ६६१ वर

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणिय वाढ होत आहे.रूग्णांचा सतत वाढणारा आकडा आता ६६१ वर जाऊन पोहोचला आहे.

राज्यात आज एकूण २६ नवे रुग्ण आढळले आहे.त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. तरीही रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे.

नवीन आढलेल्या रूग्णांमध्ये पुणे महानगरपालिका १७, पिंपरी-चिंचवडच्या ४, नगरमध्ये ३, औरंगाबाद २ अशी २६ जणांची आज एकूण वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी सहा पॉझिटीव्ह रुग्ण काल आढळले असून त्यांचा राज्याच्या यादीत अजून समावेश झालेला नाही.कोरोनाच्या आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे लोकांना घरीच राहण्याचे आवहन करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई – ३७७

पुणे (शहर व ग्रामीण भाग)– १०३

मुंबई वगळून मंडळातीत इतर मनपा व जिल्हे – ७७

सांगली – २५

अहमदनगर – २०

नागपूर – १७

लातूर – ८

बुलढाणा- ५

औरंगाबाद – ५

यवतमाळ – ४

सातारा – ३

उस्मानाबाद -३

कोल्हापूर – २

रत्नागिरी – २

जळगाव- २

वाशिम-१

सिंधुदुर्ग – १

गोंदिया – १

नाशिक – १

अमरावती -१

हिंगोली -१