Tuesday, July 23 2019 2:05 am

राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीबाबत शरद पवार व राहुल गांधी यांच्यात चर्चा

नवी दिल्ली -: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आघाडी करण्यावरून बोलणी अंतिम टप्यात आहेत. एकूण ४८ जागांपैकी ४० जागांवरील वाटप निश्चित झाले आहे. दरम्यान उर्वरित ८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्याअनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.

राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील युतीचे गुऱ्हाळ अद्याप सुरुच असून त्या तुलनेत काँग्रेस आणि एनसीपीने आघाडीबाबतची बोलणी जलदगतीने पुढे सरकवल्याचे चित्र आहे. आघाडीसाठी एकूण ४० जागांच्या वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. तर उर्वरित ८ जागांसाठी मित्रपक्षांनी किती आणि नेमक्या कोणत्या जागा लढवायच्या यावर खोलवर चर्चा सुरु असल्याचे समजते.

आज सायंकाळी नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी राहुल गांधी यांनी त्यांची सदर विषयावरून भेट घेतली. दरम्यान, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मर्लिकार्जुन खरगे हे देखिल या बैठकीला उपस्थित होते.