राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी धैर्यशील पाटील आणि नितिन पाटील यांची बिनविरोध निवड
मुंबई, 29- राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागांवर नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.