Monday, March 8 2021 4:47 am

राज्याचे मुख्यमंत्री करणार श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर :- अखेर आळंदी ते पंढरपूर पायी चालत जाणाऱ्या वारकरी समूहाचा श्री विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेण्याचा तो क्षण आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने  लाखो वारकरी हे संत महंताच्या पालखी आणि दिंडी सोहळ्याबरोबर येतात़ आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त स्वतंत्र पालख्या व दिंड्या असून त्यातून आठ ते दहा लाख वारकरी वेगवेगळ्या मार्गाने पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्याच बरोबर आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब गुरुवारी सायंकाळी पंढरपुरात दाखल होणार आहेत. गेल्या वर्षी मराठा आंदोलनच्या वेळेस मराठा संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यावेळेस मुख्यमंत्री वारीला आले नव्हते. त्यांनी आपल्या घरातच श्री विठ्ठलाची पूजा केली होती. आज सायंकाळी मुख्यमंत्री सहकुटुंब पंढरपुरात दाखल होणार आहेत.पहाटे दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडणार आहे.