Saturday, January 25 2025 8:17 am
latest

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली , 10 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. बैस यांची प्रधानमंत्र्यांसोबत पहिलीच भेट होती.

राज्यपाल श्री. बैस यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.