Wednesday, April 23 2025 1:46 am

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन

मुंबई, 8 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या तसेच वर्ल्ड बिझनेस कॉन्क्लेव्हच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या मार्गदर्शकांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ गौरव गुप्ता, सल्लागार पिनल वानखेडे, महाराष्ट्र शाखेच्या संस्थापक ऐश्वर्या वानखेडे, उपाध्यक्ष विक्रांत चंदवाडकर, डॉ संदीप मारवा, डॉ कल्पना सरोज व कौन्सिलचे पदाधिकारी उपस्थित होते.

कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने विविध देशांच्या दूतावासाच्या सहकार्याने राज्यात गुंतवणूक व व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.