Saturday, January 25 2025 7:52 am
latest

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

मुंबई, 01 : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ आज विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या सरचिटणीस डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांनी यावेळी दीक्षान्त भाषण केले.

यावेळी दीक्षान्त समारंभात १९७१६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या तर ११८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व २०५ स्नातकांना पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या.

कुलगुरु प्रो. विजय माहेश्वरी, प्रकुलगुरु सोपान इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, कुलसचिव डॉ विनोद पाटील तसेच विविध अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.