Sunday, March 24 2019 12:43 pm

राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती

सिंदखेडराजा -: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज ४२१ वी जयंती आहे. दरम्यान, या निमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे.राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी इ.स.१५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि सुराज्य संकल्पनेला घडविण्यात राजमाता जिजाऊंच्या सिंहाचा वाटा आहे.

आकर्षक तसेच भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर महामार्गालगतच आहे. इथल्याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती असा इतिहास आहे.