मुंबई, 4 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यशाळेला भेट दिली.
राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ यावेळी राज्यपालांनी जाऊन विचारपूस केली.
जेजे स्कूल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून अधिव्याख्याता शार्दूल कदम यांच्यासह सुमारे 50 विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.