Sunday, July 5 2020 8:20 am

रस्ता रूंदीकरणातंर्गत हाजुरी येथील १६३ तर राम मारुती रोड, बाळकूम येथील १२ बांधकामावर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे:ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ता रूंदीकरणातंर्गत हाजुरी येथील १३६ तर राम मारुती रोड, बाळकूम येथील १२ अनधिकृत बांधकावर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत ही करण्यात आली.ठाणे शहरात हाजुरी, हरदासनगर,राम मारूती रोड आणि बाळकूम येथे रस्ता रूंदीकरणातंर्गत कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार आज ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली.या कारवाई अंतर्गत आज हाजुरी येथील १३६ बांधकामे संपूर्णत: निष्काषित करण्यात आली. त्याचबरोबर राम मारूती रोड, बाळकूम येथील डी पी रस्ता रुंदीकरणात अडथळा होणारी १२ बांधकामेदेखील आज निष्कासित करण्यात आली.उपायुक्त संदीप माळवी, मनीष जोशी आणि अशोक बुरपल्ले यांच्या नियंत्राखालील विशेष पथके तयार करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर, सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित, सहाय्यक आयुक्त श्री जाधव, स्थानिक कार्यकारी अभियंता यांच्यासोबत पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली .