Friday, May 24 2019 9:10 am

रस्तारुंदीकरणातीलसमस्यांचे निवारण करण्यासाठी – मा. आमदार बच्चू कडू !

ठाणे-: ठाणे कोपरी येथील रस्तारुंदीकरणातील १०८ वाणिज्य बांधितांचे पुनर्वसन मागील २० वर्षांपासून रखडलेले असून सर्वसामान्य जनतेच्या निवारा/वाणिज्य न्यायहक्कासायही प्रहार जनशक्ती पक्ष व धर्मराज्य पक्षाच्या वतीने ठाणे महानगरपालिकेच्या अन्यायी व अनियमीतता कारभाराविरोधात ठाणे महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात आमदार बच्चू कडू यांच्या नेतुत्वाखाली मुद्यांना आंदोलनाचा इशारा ऍड. अजय तापकीर, चंद्रकांत गायकवाड यांनी दिला असता ठाणे महानगरपालिकेला आली जाग, सदर २० वर्षांपासून रखडलेल्या पुनर्वसनाची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून येत्या महासभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारे लेखी आश्वासन मा.मनीष जोशी (उपयुक्त) यांनी दिले आहे, सदर मुंडन आंदोलनास मा.राजन राजे अध्यक्ष धर्मराज्य पक्ष यांच्याकडून जाहीर पाठींबा देण्यात आला होता.
               ठाणे शहरातील रस्तारुंदीकरणातील बाधिताच्या पुनर्वसनाबाबत तसेच सर्वसामान्य जनतेच्या इतर तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी मा. आमदार बच्चू कडू यांचा लवकरच ठाणे शहरात जनता दरबार भरवण्यात येणार आहे.