Monday, June 1 2020 1:25 pm

रविवारी धारावीत राहुल गांधींची प्रचारसभा

मुंबई :-  आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहूल गांधी यांची येत्या रविवारी (13 ऑक्टोबर) मुंबईतील धारावी येथे येणार आहेत. राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठी हार  पत्करावी लागली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेना या महायुतीमध्ये रावेश केला. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. त्यातत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, ते सध्या सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत फारशे दिसत नाहीत.मुंबईतील धारावी येथे रविवारी सायंकाळी चार वाजता काँग्रेसची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राहुल गांधी जनतेला संबोधित करणार आहेत. या प्रचारसभेच्या माध्यमातून राहुल गांधी काँग्रेसचे विकासाचे मुद्दे सामान्य जनतेसमोर पोहोचवणार आहेत, तसेच विरोधकांचाही समाचार घेणार आहेत. तसेच पक्षाध्यक्षा सोनिया गांधीही मुंबईत प्रचारसभा घेणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली आहे.