Sunday, August 25 2019 12:03 am

पुरग्रस्त बहिणींच्या मदतीला ठाण्यातील भाऊराय सरसावले

ठाणे :-   पूरग्रस्त असलेल्या कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यातील महिलांचे संसार उध्वस्त झाले असून, महिला बघिनींनी आधार देण्यासाठी ठाण्यात अनेक भाऊराय पुढे सरसावले आहेत. बहीण- भाऊ या पवित्र रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ठाण्यात अनोख्या पध्दतीने पूरग्रस्तांनसाठी मदत निधी गोळा करण्यात आली असून येत्या काही दिवसात ही मदत निधी सुपूर्द करण्यात येणार आहे.
      ठाण्यातील कोपरी येथील तारामाऊली सामाजिक संघटनेच्या वतीने संसार मोडलेल्या महिलांना मदतीचा हात पुढे करण्यात आले आहे. दरम्यान संपूर्ण कोपरीतून मदत निधी गोळा करण्यात आली असून जमलेले लाखो रुपये पूरग्रस्त महिलांना देण्यात येणार असल्याचे यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत चव्हाण यांनी सांगितले.
    राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा,कोल्हापूर,सांगली या पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरात नुकसान झाले आहे. दरम्यान त्याचा संसार पुन्हा सुरळीत करण्याच्या उद्देशाने अनेकांनी मदत देण्याचे ठरवले असताना राज्यातून अनेक मदतीचा पूर सुरू झाला आहे. संसारात महिलांचा मोठा वाटा असतो, त्याच महिलांना धीर देण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून ठाण्यात पूरग्रस्त महिलांना भाऊराय मदत करणार आहेत.