Monday, June 17 2019 4:09 am

येत्या वर्षात अधिकच्या महिला विशेष लोकल सोडण्याच्या विचार- पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते रवींद्र भाकर.

मुंबई-: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनुसार, 2007-08मध्ये पश्चिम रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांचा आकडा सात लाखांच्या आसपास होता. येत्या दहा वर्षभरात हा आकडा 42 टक्के वाढ होऊन आता ही संख्या 10 लाखांवर गेली आहे. पश्चिम रेल्वेची प्रवासी वाहतुकीची क्षमता 36 लाख इतकी आहे. पश्चिम रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रतिदिन प्रवास करणाऱ्यांपैकी 30 टक्के महिला असून त्या नोकरदार वर्गातील आहेत.महिलांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे येत्या वर्षात अधिकच्या महिला विशेष लोकल सोडण्याच्या विचारात आहे.

पश्चिम रेल्वेवर सकाळी दोन महिला विशेष धीम्या लोकल सोडल्या जात आहेत. विरार ते चर्चगेट दरम्यान अजून काही महिला विशेष सोडण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वे करणार आहे. त्यातही रात्रीच्या गाड्यांचा समावेश असणार आहे. तसंच, रेल्वेच्या उपलब्धतेखेरीज प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेसाठीही अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य प्रवक्ते रवींद्र भाकर यांनी दिली आहे.