Wednesday, February 26 2020 8:46 am

या टरबुजाला काही अनुभव आहे का”; अभिजित बिचुकले

पुणे :-  ‘बिग बॉस मराठी २ ’ मधील फेम सदस्य अभिजित बिचुकले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  ‘अखिल बहुजन समाज सेना’ या नव्या पक्षाची घोषणा केली.केली आहे.विधानसभेच्या २८८ जागा लढविणार असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदे सांगितले.   ”भ्रष्ट प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी चांगला मुख्यमंत्री हवा असतो. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर शर्ट बदलून जॅकेट वापरायला लागले. हा विकास झाला का? या टरबुजाला काही अनुभव आहे का”, अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका त्यांनी केली.  बिग बॉस मराठी २ मध्ये बिचुकले यांना मिळालेल्या प्रसिद्धी मुळे  बिचुकले यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यांनी थेट शरद पवार यांना विधानसभेसाठी आव्हान केले आहे. उदयनराजे यांच्यासमोर लोकशाही पद्धतीने लढलो. तर मग शरद पवारांना का सोडू? पवार उभे राहिले तर १०० टक्के लढणार असल्याचे बिचुकलेंनी सांगितले.