Sunday, September 15 2019 3:13 pm

म्हणून शिवसेना सत्तेतुन बाहेर पडत नहिये : रामदास कदम

 मुंबई : अहमदनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचे प्रयत्न होते,असा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेनेला भाजपशी युती करायची नव्हती, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरु होती. या आघाडीसाठी आपण स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

रामदास कदम यांनी अहमदनगर महापौर निवडणुकीसंदर्भात सांगितले की, विधानसभा निवडणूक निकाल लागण्याआधी राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला आहे. आम्ही सत्तेतून बाहेर पडलो तर राष्ट्रवादी जागा घेईल, अशी भीती आम्हाला वाटत आहे. अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी भाजपाबरोबर आहे, हे सिद्ध झाले आहे. भाजपाने पुन्हा एकदा राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आहेत,आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोला कदम यांनी लगावला आहे.

 

असा झाला शिवसेनेचा गेम……….

६८ जागा असलेल्या अहमदनगर मध्ये बहुमतासाठी ३५ जागांचे गणित जुळवायचे होते आणि कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं तरीही शिवसेनेच्या जास्त जागा येऊनही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.महापौरपदी बाबासाहेब वाकळे तर उपमहापौरपदी मालनताई ढोणे यांची निवड झाली.शिवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे वाकळे यांचा ३७ विरुद्ध ० असा विजय झाला.

 अहमदनगर महापालिकेतील पक्षीय बलाबल अश्या प्रकारे : 

शिवसेना           :  २४

भाजपा              :  १४

राष्ट्रवादी           :   १८

कांग्रेस               :   ०५

बसपा                :   ०४

सपा                  :   ०१

अपक्ष                :   ०२

दुसरीकडे, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.