Sunday, September 15 2019 3:16 pm

मोरा ते गेट वे ऑफ इंडिया 16 किमीचे सागरी अंतर पार करण्यासाठी स्टारफिश सज्ज

ठाणे ः ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस अ‍कॅडमीचे जलतरणपटू रविवार 2 डिसेंबर रोजी मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पारकरणार आहेत. या मोहिमेत स्टारफिशचे 9 जलतरणपटू व कोल्हापूर येथील 1 जलतरणपटू सहभागी होणार आहे. ही सागरी मोहिम यशस्वीरित्या पूर्णकरण्यासाठी सध्या हे सर्व जलतरणपटू महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे मार्गदर्शक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे यांच्यामार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहेत.

या स्पर्धेत आशय दगडे, वेदांत गोखले, मानव मोरे, हर्ष पाटील, नितिश मेनन, नील वैद्य, आर्यन डोके, सर्वेश डोके, ईशा शिंदे हे स्टारफिशचे 9जलतरणपटू तर कोल्हापूरचा साईश चौगुले असे एकूण 10 जलतरणपटू सहभागी होणार आहेत. मोरा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे 16 कि.मीचेसागरी अंतर असून हे दहाही जलतरणपटू वैयक्तिकरित्या हे अंतर पार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. गेल्यावर्षी या जलतरणपटूंनी रिले पध्दतीने हेअंतर पूर्ण केले होते. यंदा वैयक्तिकरित्या 16 कि.मी चे अंतर पार करण्याचे या जलतरणपटूंचे लक्ष्य असून याकडे ठाणेकरांचे देखील लक्ष लागले आहे.

रविवारी सकाळी 9 वाजता मोरा जेट्टी येथून सर्व जलतरणपटूंनी अरबी समुद्रात झेपावणार असून यावेळी जलतरणपटूंना प्रोत्साहित करण्यासाठीसांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. हे सर्व जलतरणपटू अंदाजे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते गेट- वे ऑफ इंडिया येथेपोहचणार असून त्यांचे कौतुक करण्यासाठी मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे, आमदार अ‍ॅड आशिष शेलार,आमदार अ‍ॅड निरंजन डावखरे, ठामपाचे उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, महाराष्ट्र राज्य हौशी जलतरणसंघटनेचे सदस्य राजेश मोरे, कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.