Tuesday, July 23 2019 2:04 am

मोबाईल चार्जर स्फोट झाल्याने तरूणाचा मृत्यू

कन्नड-: मोबाईल चार्जर स्फोट झाल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना कन्नड येथे घडली आहे. कन्नड तालूक्यातील जेहूर येथे चार्जर फुटल्याने विजेचा धक्का बसल्याने संजय तातेराव पवार( वय 34) यां तरुणाचा जागीच मृत्यु झाला. काल सायंकाळी ८.३० वाजता जेवण करून मोबाईल चारजींगला लावत असतांना जास्तीचा वीज पूरवठा होत असल्याने चार्जरचा स्फोट झाल्याने या तरूणाला विजेचा जोरदार कडाक्याचा धक्का बसल्याने तरूणाचा जागीच मृत्यु झाला आहे. कन्नड येथील प्राथामीक आरोग्य केद्रांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेची नोंद देवगाव रंगारी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे . घटनेचा पंचनामा करण्यात आला असून आकस्मीत मृत्यची नोंद करण्यात आली आहे.