Sunday, September 15 2019 11:04 am

मोदी पाकिस्तानच्या मार्गाने जाणार नाही ; परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  किरगिझस्तानला शांघाय सहकार्य परिषदेच्या शिखर परिषदेसाठी पाकिस्तानच्या मार्गाने जाणार नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी पाकिस्तानची हवाई हद्द खुली करण्यात आली होती परंतु  अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विमान किर्गीस्तान मार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आले.

नरेंद्र मोदींचे विमान ओमान, इराण आणि मध्य आशियाई देशातून किरगिझस्तानला जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले