Monday, June 17 2019 4:27 am

मोदींवर लोकांचा असलेला आक्रोश ते अमितच्या लग्नापर्यंत सर्व गोष्टींवरचा लेखाजोखा, राज ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत मांडला.

नाशिक-:  नाशिक दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रच्या लोकांचा मोदीवरचा विश्वास उडाला आहे. ३ राज्यात लोकांनी मोदींवरचा राग काढला आहे,  सरकारला अनुदानासाठी पैसा नाहीत, जलसंधारण अनुदान कधी ? पैसा नाहीत तर कांदाला अनुदान कसे,  विमानात युतीची चर्चा होतात का , हे सरकार खोटं बोलणारं सरकार आहे, सर्व प्रश्नावर सरकार फसलेलं आहे. असे अनेक गोष्टी त्यांनी ह्यावेळी समोर आणून  सडकून टीका केली आहे.

नरेंद्र मोदींनी नोटा बंद करून स्वतःचा राजकीय खड्डा खणला. मोदींपेक्षा सगळ्यात जास्त देश कोणीच खड्ड्यात घालू शकत नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी मोदींवर घणाघाती आरोप केला.

अमित ठाकरेच्या लग्नाबद्दल हि ते ह्यावेळी म्हणत होते, २७ जानेवरी रोजी आहे, पक्षातील व इतर मित्रपरिवारातील ठराविक लोकांनाच लग्नाचं आमंत्रण देणार आहोत, मोदींना लग्नाला बोलवणार का? असा प्रश्न केला असता त्यांचा लग्न या गोष्टींवर विश्वास आहे का. असे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदातून निरोप घेतला.