Saturday, April 20 2019 12:40 am

मोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला,20 जण जखमी

मीदनापूर  :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.

मीदनापूर येथे मोदींची सभा सुरू होती. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी भाजप आणि मोदी समर्थक मोठय़ संख्येने जमले होते. मोदींचं भाषण सुरू असतानाच मंडप कोसळला. हे समजताच मोदींनी एसपीजी पथकाला तात्काळ सूचना देऊन जखमींना मदत करण्यास सांगितले. पश्चिम बंगाल सरकारतर्फे जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत करण्यात येईल. मिदनापूर सभेत जखमी झालेल्यांची प्रकृती लवकर बरी होवो यासाठी प्रार्थना करते, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.