Tuesday, March 26 2019 2:26 pm

मोझिला कॅफे हॉटेलमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट

उरण -: पनवेल नजीकच्या उरण शहरातील मिलिंद सोसायटीच्या तळमजल्यावर बिमला तलावनजीक असलेल्या मोझिला कॅफे हॉटेलमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट झाला.  4 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल आणि नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आलं आणि त्यांनी आग विझवली आहे. 

या स्फोटात  हॉटेलचे शटर उघडण्यासाठी गेलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याचं नावं मनील हिरा (३५) असून तो ७० टक्के भाजला आहे.  अचानक झालेल्या या स्फोटामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षेतील प्रवासी आणि मोटारसायकलस्वार जखमी झाला आहेत. दमर गुल (२४), संगीता ठाकूर (४२) आणि संजय ठाकूर (५४) अशी यांची नावे आहेत.