Wednesday, June 3 2020 11:50 am

मे अखेर नालेसफाई आणि गटारांची सफाई करामनसेच्या अनिल म्हात्रे यांची मागणी

ठाणे  :  कोरोना संकट काळात ठाण्यातील बहुतांश गटारांची सफाई झालेली नाही. तर नाल्यांची सफाई देखील संथगतीने सुरु आहे. त्यात पावसाळा तोंडावर आला आहे. अनेक नागरीक कोरोनामुळे भयभीत होवुन आपआपल्या गांवी स्थलांतरीत झाले आहेत. या स्थलांतरीत नागरीकांपैकी 8क् टक्के नागरीक हे झोपडपट्टीत, चाळीत राहतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता कोरोना संकट अजुन काही पुढील महीने संपणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत. म्हणजेच जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत आपल्या मुळगावी स्थलांतरीत झालेले नागरीक लवकर परत येण्याची शक्यता फार कमीच, त्यामुळे त्यांची घरे सुद्धा बंदच राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात गटाराचे पाणी जाऊन आणखी हानी होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर झोपडपटटी भागातील किंबहुना शहरातील सर्व गटारांची साफसफाई करावी अशी मागणी मनसेचे ठाणो शहर सचिव अनिल म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.
येत्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. परंतु शहरातील गटारांची अद्यापही सफाई झालेली नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाचा सामना करतांना दुसरीकडे शहरातील गटारे जर पावसाळ्यात तुंबली तर झोपडपटटी भागात बंद असलेल्या घरांमध्ये पाणी शिरुन येथील नागरीकांचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच काम धंदा नसल्याने, पैसा हाती नसल्याने नागरीकांचे घर सावरण्यासाठी देखील मोठे कष्ट करावे लागतील अशी चिन्हे देखील निर्माण होऊ शकतात. इतकेच नाही तर साचलेल्या त्या पाण्यामुळे अनेक नाशवंत वस्तु सडतील, कुजतील त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरेल. काहींच्या बंद घरात उंदरे, घुशी, मांजरे मरु न पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना बरोबर इतर साथींचे आजारही शहरात येऊ शकतात. त्याममुळे  यंदा नालेसफाई आणि गटारांची सफाई 31 मे 2020 पर्यंत म्हणजेच चौथा लॉकडाऊन कालावधी संपण्यापूर्वी अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांना इमेलद्वारे पाठविलेल्या पत्रत केली आहे.