Saturday, September 18 2021 12:34 pm
ताजी बातमी

“मेसेंजर”वर हि आता मेसेज डिलिट करता येणार

आता फेसबुकवरही व्हॉट्सअॅपप्रमाणे एकदा पाठवलेला मेसेज डिलीट करता येणार असून आता लवकरच एकदा पाठवलेला मेसेज फेसबुक मेसेंजरचे युजर्स डिलीट करु शकणार आहेत. मेसेंजरवर लवकरच हे नवे फिचर येणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. iOS चे व्हर्जन १९१.० मध्ये सर्वप्रथम हे फिचर येणार आहे. युजरकडे मेसेज डिलीट करण्यासाठी १० मिनिटांचा वेळ असेल, म्हणजे मेसेज पाठवल्याच्या १० मिनिटांमध्येच हा मेसेज डिलीट करता येणार आहे.

युजर्सकडून अशा फिचरची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. एप्रिल महिन्यापासून या नव्या फिचरबाबत कंपनीचा विचार सुरू होता आणि या फिचरची चाचणी ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती. नव्या अपडेटमध्ये iOS युजर्स कोणताही मेसेज १० मिनिटांच्या आतमध्ये डिलीट करु शकतील. जर एखाद्या युजरने चुकून एखादा मेसेज किंवा फोटो पाठवला तर डिलीट करण्यासाठी त्याला १० मिनिटांचा वेळ मिळणार आहे.