Saturday, April 20 2019 12:12 am

मेळघाटातील सशस्त्र हल्लाप्रकरणात 50 वन कर्मचाऱ्यांसह 15 पोलीस जखमी

अमरावती-: वनविभाग आणि आकोट पोलिसांवर दोन दिवसांपूर्वी काही स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई न केल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य वनरक्षक आणि वनपाल संघटनेनं दिला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनही दिलं आहे. या हल्ल्यात मेळघाटातील सशस्त्र हल्लाप्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 50 वन कर्मचाऱ्यांसह 15 पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, अमरावती जिल्हाधिकारी परिसरात आज तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
याबद्दल माहिती मिळताच उपवनसंरक्षक अकोट आणि पोलीस अधिकारी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि ज्या आंदोलनकर्त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी गेले होते. चर्चा शांततेत सुरु असताना काही आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी पोलीस आणि वनविभागच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरु केली. तसेच विळा आणि कुऱ्हाडींच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी शासनाच्या 15 गाड्यांची तोडफोड केली आणि जंगलाला देखील मोठ्या प्रमाणात आगी लावल्या होत्या.