Friday, May 24 2019 8:21 am

मुलुंड डम्पिंग ला आग

यतीन पवार /लोक्वृत्तांत ब्युरो 
मुंबई : १ अक्टोबर ला बंद करण्यात आलेल्या मुलुंड डम्पिंग ग्राउंड ला मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास आग लागली होती . ह्या आगीचे प्रमाण एवढे मोठे होते कि त्याचा धूर पूर्व द्रुतगती मार्गावर दिसत होते .आगीचे कारण अद्यापही कळले नसून ही आग विजवण्यासाठी मुंबई अग्निशामक दलाच्या ४ गाड्या रवाना झाल्या आहेत .अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा येत आहे. ठाणे आणि मुलुंड च्या मधे असलेल्या हरी ओमनगर येथील कच-याच्या डंपिंग ग्राउंडला आज मोठी आग लागली.मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास बंदी असून सुद्धा आगीचे सत्र सुरूच आहेत म्हणून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे .