Monday, April 6 2020 2:27 pm

मुलुंडमधील आनंद टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी, खासगी वाहनांच्या रांगा

मुंबई : राज्यात जमावबंदीचे आदेश दिले आहे. मात्र हे आदेश झुगारुन अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे. मुलुंडमधील आनंद नगर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी गाड्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.मुलुंडमधील आनंद टोल नाक्यावर सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या टोलनाक्यावर चार चाकी वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यात अनेक वाहन ही खाजगी असून हे सर्व नागरिक कामासाठी घराबाहेर पडले आहे.मात्र मुंबई पोलिसांनी सजग राहत जे लोक अत्यावश्यक सेवेचा भाग आहेत, त्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडत आहेत. तर इतर गाड्यांना परत माघारी पाठवत आहे.तर दुसरीकडे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर बाहेरच्या राज्यातून कामानिमित्ताने आलेल्या तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद झाल्याने या नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.

यातील अनेक प्रवाशांनी आक्रमक पावित्रा धारण करत आम्ही आता खाणार काय, कुठे जाणार? असे अनेक प्रश्नही नागरिक विचारत आहे.‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूची वेळ संपलेली असली, तरी आता स्वयंशिस्त पाळण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू झाली असून त्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली.

त्यानंतर आज सकाळी 5 ते 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच, जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाणार