Tuesday, July 23 2019 2:09 am

मुलांसाठी लग्नाची वयोमर्यादा 18 वर्षे करण्याची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली :लग्नासाठी मुलाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्याबाबत वकील अशोक पांडे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठावला.

यापूर्वी विधी मंत्रालयाने देखील सर्व धर्मांच्या मुली आणि मुलांचे लग्नाचे वय 18 वर्षे करण्याबाबत सुचवले होते. आपल्या सल्लापत्रकामध्ये मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते की, जर निवडणुकांमध्ये मत देण्यासाठी सर्वांना एकाच वयाची अट असते तर आपला जीवनसाथी निवडण्यासाठीही लायक समजायला हवे.त्यामुळे या याचिकेत करण्यात आलेली मागणी योग्य नाही. त्यामुळे मुलांचे लग्नाचे वय पूर्वीप्रमाणेच कायम राहिल अशी सुनावणी सरन्यायधीश रंजन गोगोई ,जस्टिस एस के कौल आणि जस्टिस के जोसफ यांच्या खंडपीठाने दिली आहे.