Sunday, September 15 2019 4:01 pm

मुलांनी चांगले शिक्षण घेऊन विभागाचे नाव उंचवावे जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे

ठाणे :-  १०वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी  योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टी लोकमान्यनगर शास्त्रीनगर विभाग यांच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी  गुणगौरव व करियर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

करियर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मुलांना करियर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे व या माध्यमातून मुलांनी चांगले शिक्षण घेऊन विभागाचे नाव उंचवावे अशी भावना जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी व्यक्त केली
ठाण्यातील सावरकर नगर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर सभागृह येथे स्थानिक जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या हस्ते १०वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय तंत्रनिकेतन मुंबई प्राचार्य सौ स्वाती देशपांडे, नगरसेविका राधाबाई जाधवर,नगरसेवक दिगंबर ठाकूर,विधानसभा अध्यक्ष संतोष पाटील,वार्ड अध्यक्ष पुरुषोत्तम ठाकूर,समाजसेवक प्रशांत जाधवर,संदीप घोगरे,करियर वक्ते रवींद्र कमटम आदी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.यावेळी रवींद्र कमटम यांनी मुलांनी करियर निवडताना काय करावे याबाबत मार्गदर्शन केले

सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग  १०वी व १२ वी नंतर मुलांना करियर निवडताना योग्य मार्गदर्शन मिळावे व पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवून विभागाचे नाव उज्वल करावे या हेतूने सदरचे करियर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्याचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी यावेळी सांगितले.गोरगरीब मुलांना चांगले व उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सावरकर नगर सारख्या विभागात स्वर्गीय रामचंद्र ठाकूर ( भाऊजी ) यांनी दर्जेदार अशी शाळा याठिकाणी सुरु करून शिक्षणाचे दार सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले केले.त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी करियर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून योग्य दिशा निवडून नावलौकिक मिळवून आई-वडील यांच्या सह विभागाचे नाव उज्वल करावे असे श्री जगदाळे यांनी सांगून उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.