Monday, May 19 2025 10:56 pm

मुरबाड मतदारसंघात संपन्न झाले निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

ठाणे, 08 १३९ मुरबाड मतदारसंघात आज दि. ०७ एप्रिल २०२४ रोजी मतदान कर्मचारी (Presiding officer, First Polling officer, Other Polling officer) यांचे दोन सत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
प्रथम सत्रात प्रथम उपस्थिती नोंदवून त्याच ठिकाणी 50 मतदान कर्मचाऱ्यांसाठी 3 क्षेत्रीय अधिकारी व 2 EVM Set देवून सोबत Dummy Paper seal, Address tag, Special tag इत्यादीच्या आधारे प्रत्यक्ष हाताळणी व प्रात्यक्षिकाद्वारे सखोल प्रशिक्षण देण्यात येवून तद्नंतर विस्डम इंग्लिश स्कूल मुरबाड. या ठिकाणी सखोल पायाभूत प्रशिक्षण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली पवार यांनी दिले. त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसनही केले. तसेच, स्वतः मतदार असलेल्या सर्व उपस्थित मतदार कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन करून त्यांना पोस्टल बॅलेट (Postal Ballot) व निवडणूक कार्यप्रमाणपत्राद्वारे (EDC) मतदान कसे करावयाचे व कसे करवून घ्यायचे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणादरम्यान मतदान कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय कक्ष व तपासणी, तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला होता. सर्व कर्मचाऱ्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आवर्जून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले व टपाली मतपत्रिकेचे फॉर्म जमा करून घेण्यात आले.
सर्व प्रशिक्षण प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची व सखोल माहिती प्राप्त झाल्याचा अभिप्राय उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांनी दिला.
प्रशिक्षणाच्या ठिकाणी मा. संजय जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ, श्री संदीप आवारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी मास्टर ट्रेनर ची भूमिका चोख बजावली.