Wednesday, November 6 2024 6:16 pm

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी, पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ.दिलीप सपाटे, जयेश सामंत, विभव बिरवटकर सन्मानित

ठाणे, 22 :- राज्य शासनाच्या “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” समितीवर ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक कैलास म्हापदी यांची, तसेच राज्य व विभागीय अधिस्वीकृती समितीवर पत्रकार संजय पितळे, विनोद जगदाळे, डॉ. दिलीप सपाटे, जयेश सामंत आणि विभव बिरवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.20 ऑगस्ट) रोजी झालेल्या “राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण” सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सचिव नीलेश पानमंद, कोषाध्यक्ष विभव बिरवटकर, मनोज सिंग, पदाधिकारी, पारितोषिक विजेते छायाचित्रकार, नागरिक उपस्थित होते.