Friday, January 22 2021 9:25 am

मुंब्र्यात “शबे बारात”च्या रात्री नागरिकांना कब्रस्तानमध्ये “नो एंट्री”

ठाणे : लॉकडाऊन नंतरही मुंब्रा परिसरात राजरोसपणे नागरिकांचा वावर सुरु होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने अखेर नागरिकांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या दिमतीला राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली. सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होत असल्याने मुंब्रा परिसरातील सर्वच मशिदीत सामूहिक नमाज पठण  बंद करण्यात आले. आता मुंब्रा परिसरात एक कोरोनोचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने आता नागरिकांची गर्दी टाळणायसाठी आणि सोशल डिस्टन्सचे उल्लंघन होऊ नये म्हणून मुंब्र्यातील नागरिकांनी “शबे बारात” च्या रात्री कब्रस्तानची टाळेबंदी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाचे धार्मिक गुरु मौलवी यांनी घेतला आहे. त्यामुळे आता शबे बारात च्या रात्री नागरिकांना कब्रस्तानमध्ये “नो एंट्री” करण्यात आलेली आहे.
         मुंब्रा हा मुस्लिम बहुल परिसर आहे. मुंब्रा परिसरात कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकाच खळबळ उडाली आहे. मुंब्र्यात रस्त्यावर, नाक्यावर आणि बाजारात खरेदी करताना सोशल डिस्टन्सच्या तीन तेरा वाजल्या होत्या. सोशल डिस्टन्समुळे कोरोनोचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढल्याने शासनाने कडक अंमलबजावणी करीत राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली. मात्र मशिदीत सार्वजनिक नमाज बंद केल्यानंतर मुंब्रावासीयांनी पुन्हा एक धाडसी निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन होऊ नये म्हणून  शबे बारात ला बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्र सरकारकडून देखील आवाहन करण्यात आले होते. या सर्वांच्या आव्हानाला मुंब्रा वासी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वांनी देखील याचे पालन करायला हवे. आठ तारखेला शबे बारात ची रात्र असून याच पृष्ठभूमीवर मुंब्रा परिसरातील सर्व मौलानांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मौलाना वाजिद सावंत, मूप्ती अश्रफ आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश होता.  शबे बारात च्या रात्री मुस्लिम बांधवानी घराबाहेर पडू नये आणि कब्रस्तानमध्ये जाऊ नये असे आवाहन एकत्रीत पणे केले. त्याला मुस्लिमधर्मीयानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आठ एप्रिल रोजी कब्रस्तानमध्ये “नो एंट्री” चा बोर्ड लागणार आहे.