Saturday, April 20 2019 12:24 am

मुंब्रा बायपासवर दुचाकीला अपघात दोन जण ठार तर एक जखमी

ठाणे : प्रतिनिधी कॉलेजला दांडी मारून एक्टीव्हा दुचाकीवर ट्रिपलसीटने मुंब्रा बायपासवर भरारी मारणाऱ्या त्रिकुटाने कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात घडलेल्या अपघातात दिचाकी चालक आणि मागे बसलेल्या दोघा तरुणाचा मृत्यू झाला. तर मध्ये बसलेल्या तरुणाचा जीव वाचला. त्याला उपचारासाठी मुंब्र्याच्या काळसेकर रुग्णालयात दाखल करणायत आले आहे. या घटनेची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. 
 
        मृतक शाहिद अहमद अंसारी (वय: 18) रा. नूरानी मंजिल, अलिशान थेटर, मुंब्रा रेलवे स्टेशन जवळ, ठाणे, मृतक शमसाद राही (वय: 19)हिना अपार्टमेंट, ठाकुर पाड़ा. मुंब्रा, ठाणे आणि जखमी आशिफ खान(वय: 18) रा. दत्ता वाड़ी, मुंब्रा यांचा समावेश आहे. जखमी आशीफ याच्यावर काळसेकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या डोक्याला टाके पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मृतक शाहीद अन्सारी, शामदास राही आणि जखमी आशीफ हे मित्र असून महाविद्याल्य्न विद्यार्थी आहेत. सोमवारी सकाळी हे एक्टीव्हा दुचाकीवरून मुंब्रा बायपासवर भरारी घेत होते. ठाण्याकडून मुंब्रा परिसराकडे येताना कंटेनरला ओव्हर टेक करताना दुचाकी धडकून अपघात घडला. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. या अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करणायत आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.