Sunday, April 18 2021 10:34 pm

मुंब्रा प्रभाग ३१ मधील धोकादायक इमारती मधील २१ कुटुंब झाले बेघर 

* इमारत खाली केली….. मात्र विस्थापितांचे पुनर्वसन केले नाही

* आयुक्तांची भेट घेऊन करणार मागणी

ठाणे :  ठाणे पालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या अखत्यारीत असलेल्या  मुंब्रा आनंद कोळीवाडा परिसरातील ३० वर्ष जुनी इमारतीचा स्लॅब पडून सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्नीशमन दल, प्रभाग समिती अधिकारी यांनी इमारत खाली करून इमारतीचा पाणी, विद्युत खंडित करण्यात आले होते. मात्र विस्थापित होणाऱ्या २१ कुटुंबाना अद्याप राहण्यासाठी कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नसून ती कुटुंब विस्थापित होऊन नातेवाईकांच्या घरात आसरा घेतल्याची माहिती समाजसेवक नितीन मोरे यांनी दिली.
        मुंब्रा प्रभाग समितीच्या प्रभाग क्र -३१ मध्ये आनंद कोळीवाडा परिसरातील विशाखा अपार्टमेंट हि ३० वर्ष जुनी इमारतीचा स्लॅब कोसळल्याने आणि पिल्लरला भेगा पडल्याने खाली करण्यात आलेली होती. बाजूच्या इमारतीत सुरु असलेल्या ठोककाम यामुळे स्लॅब पडला होता. दरम्यान मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक साळुंखे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खाली केली होती. या इमारतीत २१ कुटुंब राहत होते. तर तळ + चार माळ्याची इमारत असून टेरेसवर दोन प्लॅट होते. तब्बल २१ कुटुंब आज इमारत खाली केल्याने घर देता का घर अशा अवस्थेत भटकत आहे. सदर विस्थापित कुटुंबाना त्वरित राहण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी आता समाजसेवक नितीन मोरे यांनी मुंब्रा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त आणि पालिका आयुक्त याना निवेदन देऊन मागणी केलेली आहे.
२१ कुटुंब रस्त्यावर…नातेवाईकांच्या घरी घेतला आसरा  
पालिका प्रशासन जर्जर इमारती खाली करून दुर्घटना टाळण्यासाठी इमारत खाली करतात मात्र इमारतीतील नागरिकांचे मात्र पुनर्वसन करण्यात येत नाही. मुंब्रा परिसरातील अनधिकृत इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येतो तसाच विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही ऐरणीवर येत आहे. आनंद कोळीवाडा इमारत खाली करून सील केल्यानंतर इमारतीतील २१ कुटुंबं हे विस्थापित झाले कुटुंब बेघर झाले आहेत. यातील काहींनी नातेवाईकांच्या घरी आसरा घेतला आहे. तर विस्थापित मात्र पुनर्वसन करून राहण्यासाठी घरे द्या अशी मागणी करीत आहेत. 
 
कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आयुक्तांची भेट घेणार 
मुंब्रा आनंदनगर कोळीवाडा परिसरातील विशाखा अपार्टमेंट हि धोकादायक झाल्याने खाली करण्यात आली. स्लॅब पडल्याने सहाजण जखमी झाले होते. यात  डॉ.आंबेडकर चळवळीचे, तसेच बौद्ध उपासक उपासिका संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आयु.कडलक यांचे कुटुंब यांचा समावेश आहे. त्यांना नुकसान भरपाई सोडाच पण पुनर्वसनही करण्यात आलेले नाही. त्यांचे पुनर्वसन करावे अशा मागणीचे निवेदन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मुंब्रा-कौसा या सामाजिक संस्थेचे सचिव नितीन मोरे यांनी केले आहे. या पुनर्वसनाच्या बाबत लवकरच संघटना पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन विस्थापितांचे दुःख मांडणार आहे.