Tuesday, July 23 2019 2:42 am

मुंब्रा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे -: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम,फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत मुंब्रा प्रभाग समिती  कार्यक्षेत्रातील अमृतनगर येथील अनधिकृत गाळ्याचे  सुरु असलेले बांधकाम आज तोडण्यात आले.  दरम्यान जवळपास  २० स्टॉल, २५ बाकडी,  २५ ठेले तसेच २० हातगाड्या,  चायनीज गाड्या जप्त करण्यात आल्या तर ७९ अनधिकृत डिजिटल बॅनर जप्त करण्यात आले.

त्या कारवाई अंतर्गत मुंब्रा स्टेशन परिसर,अमृतनगर ,कौसा रोड, कादर पॅलेस  इद्यादी परिसरातील २०   स्टॉल, २५ बाकडी, २० प्लास्टिक बांबूशेड, २५ ठेले तोडण्यात आले. पारसिकबंदर ते कादर पॅलेस या परिसरातील ७९ डिजिटल बँनरसह २० हात गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या कारवाईमुळे मुंब्रा परिसरातील पादचारी व वाहन चालकांना रस्ते मोकळे मिळत असून या कारवाईचे मुंब्रातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.या कारवाई बरोबरच मुंब्रा प्रभाग समितीमधील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम देखील तीव्र केली जात आहे.

सदरची कारवाई मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मागर्दर्शनाखाली सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात महापलिकेच्या अतिक्रमण विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. यापुढे ही शहरातील अनधिकृत फेरीवाले,हातगाड्या व बॅनरवर महापलिकेच्यावतीने कठोरपणे  कारवाई करण्यात येणार आहे.