Monday, October 26 2020 3:13 pm

मुंब्रा परिसराला डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी उपलब्ध करून दिली अद्ययावत रुग्णवाहिका

ठाणे :  कोरोनाच्या महामारीमध्ये रूग्णांना वेळेत रूग्णालयात जाणे शक्य व्हावे, या उद्देशाने गृहनिर्माण मंत्री ना डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून मुंब्रा परिसराला अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. रविवारी सकाळी या रुग्णवाहिकेचे डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अश्रफ-भाईसाहब उपस्थित होते.
सध्या मुंब्रा परिसर कोरोनामुक्त होत आहे. मात्र, पूर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांनी ऑक्सीजनयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. परिवहन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान यांच्या इत्तेहाद ट्रस्टच्या माध्यमातून या रुग्णवाहिकेची मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे.
आज लोकार्पण झाल्यानंतर लगेचच ही रुग्णवाहिका रूग्णसेवेसाठी तैनात करण्यात आली.
यावेळी डाॅ.आव्हाड यांनी कोरोना काळात रुग्ण वाहिनीवर प्रचंड ताण आहे.अश्या वेळी इत्तेहाद ट्रस्टने ही सेवा सुरू केल्याबद्दल कौतूक केले. यावेळी नगरसेवक शानू पठाण, राजन किणी, सिराज डोंगरे, सुनिता सातपुते, रेहान पितलवाला, जफर नोमानी, मोरेश्वर किणी आदी उपस्थित होते