Monday, June 17 2019 4:06 am

मुंब्रा कब्रस्तानसाठी देखरेखीत ठेवलेल्या  भूखंडावर पालिकेने केले उद्यानाचे काम सुरु 

ठाणे -: वाढती  लोकसंख्या , मुदतीपूर्वीच कबरीतून मृतदेहाचे काढावे लागणारे आवशेष यामुळे मुंब्रयात अनेक वर्षापासून कब्रस्तानची मागणी करणायत येत आहे. मुंब्र्यात अनेकवेळा विविध ठिकाणी कब्रस्तानचे शुभारंभ झाले मात्र कब्रस्तान मुंब्रावासियाना अद्याप मिळाले नाही. मुंब्रावासियांचे कब्रस्तान राजकारणात अडकले आहे. अनेकवर्ष मागणी केल्यानंतर  कब्रस्तानची जागाही निश्चित  करणायत आलेली नाही. जमियतुल मुस्लिमीन ट्रस्टच्या देखरेखीत असलेल्या जागेवर कब्रस्तान करावे अशी मागणी ट्रस्टद्वारे करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहारहि केला. तर त्र त्याच जागेवर महापालिकेने कोट्यावधी रुपये मंजूर करून उद्यान बनविण्याचे काम सुरु केल्याने मुंब्रा परिसरात संताप व्यक्त करणायत येत आहे. जर पालिकेने काम थांबविले नाही तर उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे कायदेशीर सल्लागार शमीम एहसान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
           मुंब्रावासियांना १०५० मध्ये पाच एकरचा प्लॉट हा कब्रस्तानसाठी शासनाने दिला होता. मात्र त्या ब हुखान्दावर अतिक्रमण झाले आणि प्लॉट गिळंकृत करणायत आला. त्यानंतर आजपर्यंत कब्रस्तानला भूखंड देण्यात आला नाही. किंवा आरक्षितही करणायत आला नाही. तर अनेक भूखंडावर कब्रस्तान होणार अशा बातम्या पसरविण्यात आल्या. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. मुंब्र्यात कब्रस्तान राजकारणात लटकल्याचा आरोप माजी महापौर नईम खान आणि वसिम सय्यद यांनी पत्रकार  परिषदेत केला. दरम्यान मुंब्रावासियाना कब्रस्तान गरजेचे असल्याने जमियतुल मुस्लिमीन ट्रस्टच्या देखरेखीत असलेला अडीच एकर तळ्याचा हेरीटेज प्लॉट आहे. त्यावर कब्रस्तान बनविण्यात यावे अशी एकमुखी मागणी जमियतुल मुस्लिमीन ट्रस्टच्या वतीने करण्यात आली.या ठिकाणी कब्रस्तान करण्याऐवजी त्याठिकाणी महापालिकेने  उद्यानाचे काम सुरु केले आहे. मुंब्रावासियाना उद्यान नको तर कब्रस्तान गरजेचे असल्याचे माजी महापौर नईम खान यांनी पत्रकर परिषदेत  सांगितले. जर सदर ठिकाणी उद्यानाचे काम न थांबविल्यास न्यायलयात जाण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. दोन दिवसापूर्वीच जमियतुल मुस्लिमीन ट्रस्टच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री रणजीत पाटील यांची भेट घेऊन व्यथा मांडली. त्यांनी मुंब्रा कब्रस्तान करिता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
 
… आम्हाला कब्रस्तान हवं आहे, उद्यान नको 
मुंब्रा सर्व्हे क्र ८४, ८५, ९० आणि ९६ लगतचा अडीच एकरचा प्लॉटवर ब्रिटीश काळापासून तळे होते. याठिकाणी भूमाफियांनी तळे बुजवून अतिक्रमण केले. उर्वरित मोकळया  अडीच एकर जागेची देखरेख १९९० पासून ट्रस्ट  करीत आहे. जर जमियतुल मुस्लिमीन ट्रस्ट या जागेवर दावा केला नसता तर हा भूखड  भूमाफियांनी अतिक्रमण करून हडप केला असता, पण आता महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी उद्यान करीत आहे. या उद्यानाचा फायदा कुणाला होणार आहे. उद्या याच उद्यानात नशेडी कब्जा करतील असा सूर काढण्यात आला. 
 
मुंब्र्याला खूप दिले, पण मिळाले काहीच नाही 
मुंब्रावासियांना यापूर्वीच खूप काही दिले. मुंब्रा परिसरात खेळाचे मैदान झाले, स्टेडीयम बांधले, कब्रस्तानसाठी भूखंडाची घोषणा झाली. सोल्टर हाउसची घोषणा हि केली. पण प्रत्यक्षात मैदान आणि स्टेडीयम व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही. कब्रस्तानची अनेक उद्घाटने झाली. पण कब्रस्तान आजवर मिळाले नाही, सोल्टर हाउस आरक्षण असलेली जागा काही प्रमाणात सीआरझेडने बाधित झाली तेही बारगळले. आता रिकाम्या भूखंडावर कब्रस्तान करा म्हणून मागणी होते आहे. तेथे उद्यान बनविण्याचे काम सुरु करणायत आले आहे.