Thursday, November 15 2018 1:36 pm

मुंबई – रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प

 

मुंबई – रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. माटुंगा-दादर रेल्वे स्टेशनदरम्यान विद्यार्थ्यांनी लोकल, एक्स्प्रेस अडवून ठेवल्या आहेत. यामुळे सीएसटीच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. यामुळे  कार्यालय गाठण्याच्या घाईत असणा-या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरुन पायी प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत.