Thursday, December 5 2024 6:19 am

मुंबई मॅरथॉनमध्ये इथिओपियाच्या धावपटूचे वर्चस्व

मुंबई,१५: १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:१५ वाजता सुरुवात झाली होती. एलिट धावपटूंसाठी असणारी ४२.१९७ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन नुकतीच पार पडली. या मॅरेथॉनला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी झेंडा दाखवला होता. संपूर्ण मॅरेथॉन कॅटेगिरीमध्ये ५५ हजार धावपटू धावले यात विदेशी धावपटूंसह भारतीय धावपटूंनीही बाजी मारली. हयले लेमी, फिलेमन रोनो, हेलू झेदू अशी विजयी धावपटूंची नावे आहे.

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपीयाच्या धावपटूंचे वर्चस्व पहायला मिळाले. हायले लेमी याने पूर्ण मॅरेथॉनमध्ये बाजी मारली. तर भारतीय धावपटूंमध्ये गोपी टी हे विजयी झाले. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या हयले लेमी यांनी २ तास ७ मिनिटे ३२ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. तर दुसऱ्या क्रमांकावर केनियाचे फिलेमन रोनो यांनी २ तास ८ मिनिटे ४४ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. तर तिसऱ्या क्रमांकावर असणारे हेलू झेदू इथोपियन नागरिका असणारे यांनी २ तास १० मिनिटे २३ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली.

या स्पर्धेत हजारो मुंबईकर सहभागी झाले होते. थंडीचा जोर आणि मुंबईकरांचा उत्साह या स्पर्धेत पाहायला मिळाला. दहा आणि 21 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अनेक स्पर्धकांनी जल्लोष केला.
दोन वर्षानंतर मुंबईकर 18 व्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले होते. 2020 नंतर प्रथमच होणाऱ्या या कार्यक्रमात मुंबईकर आपले कौशल्य दाखवण्यासाठी धावत होते. 2021 आणि 2022 मध्ये मुंबई मॅरेथॉनचे आयोजन कोरोनामुळे होऊ शकले नाही. यामुळेच यावेळच्या मॅरेथॉनबद्दल लोकांमध्ये अधिक उत्साह होता. यावेळी मुंबई मॅरेथॉनसाठी 55 हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. हाफ मॅरेथॉन वगळता इतर सर्व शर्यती रविवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाल्या.

या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर असलेला योहान ब्लेक याच्यामते मॅरेथॉन धावणे सोपे नव्हते. यात याप्रकारे एका विशिष्ट वेगाने धावावे लागते आणि हे इतके सोपे नाही. त्यासाठी सर्वोत्तम शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती असणे गरजेचे आहे.

५०० सदस्यांच्या महत्त्वाच्या टीम शर्यतीच्या दिवशी तैनात होत्या. तसेच ८०० ट्राफिक पोलीस ६०० पोलीस ऑफिसर आणि ३ हजार पोलीस या दिवशी रूटवर तैनात होते. तसेच ४५० मेडिकल स्टाफ आणि एशियन हार्टचे ५० वॉलेंटियर त्यांच्यासोबत १३ अॅम्बुलन्स, डॉक्टर मोटरसायकलवर तैनात होते. रस्त्यांचे मार्ग सुद्धा बदलण्यात आले असून तीन ठिकाणी ५०, ५० आणि ३० खाटांचे बेस कॅम्प तयार करण्यात आले होते. १६ एड स्टेशन सुद्धा तयार करण्यात आले होते. २५ वॉटर स्टेशन, १० स्नॅक स्टेशन, ११ एलिट ड्रिंक स्टेशन तैनात करण्यात आले होते. सायन्स स्टेशन ते माहीम या दरम्यान सकाळी ३ ते ५ वाजता ३० बस सेवा सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.