Sunday, April 18 2021 11:30 pm

 मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरची 5 वाहनांना धडक; नवी मुंबईचे डॉ. वैभव झुंजारेंसह 5 ठार तर 5 जखमी

मुंबई : पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव कंटेनरने पुढे जाणार्‍या 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले असून 5 जण जखमी झाले आहेत.

कंटेनर हा पुण्याहून मुंबईकडे जात होता. मध्यरात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास खोपोलीजवळ कंटेनरने पुढील वाहनांना एकामागोमाग धडक दिली. क्रेटा, इनोवा, ट्रेलर, ट्रक आणि अन्य अशा पाच वाहनांचा अपघात झाला आहे.
या अपघातात मंजू प्रकाश नाहर ( वय ५८, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम), डॉ. वैभव वसंत झुंझारे (वय ४१, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न. मु. महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई), उषा वसंत झुंझारे ( वय ६३), वैशाली वैभव झुंझारे (वय ३८), श्रिया वैभव झुंझारे ( वय ५, रा.ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत.

स्वप्नील सोनाजी कांबळे (वय ३०, रा. फ्लॅट नं. २०१, इंद्रपुरी, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम), प्रकाश हेमराज नाहर ( वय ६५, रा. इंद्रपुरी, ६०२, जवाहर नगर, एस.व्ही.रोड, गोरेगाव पश्चिम ), अर्णव वैभव झुंझारे ( वय ११, रा. ए/१-३,४, अधिकारी वसाहत, न.मु.महानगरपालिका, सेक्टर १५, नेरुळ, नवी मुंबई), किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट अशी जखमींची नावे आहेत. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वैभव झुंजारे हे नवी मुंबई महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी होते. ते त्यांच्या खासगी कारने नवी मुंबईकडे येत होते. कोरोना काळात त्यांच्यावरही कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने त्यांनी खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडिल, पत्नी व मुलांना गावी ठेवले होते. सोमवारी रात्री या सर्वांना घेऊन ते परत येत असताना हा अपघात घडला. या अपघातात डॉ. झुंजारे स्वत: त्यांची पत्नी, आई आणि मुलगी यांचा जागीच मृत्यु झाला आहे.