Saturday, August 24 2019 11:14 pm

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ‘ब्लॉक

मुंबई :-

तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवरील धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १४ मे २०१९ ते १७ मे २०१९ व २१ मे ते २३  मे दरम्यान  असेल
ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत दरतासाला १५ मिनिटांकरिता वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी एकूण ६ ब्लॉक असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तो ब्लॉक पुढील प्रमाणे असेल…..
वेळ –
ब्लॉक १- १०.०० ते १०.१५, ब्लॉक २ – ११.०० ते ११.१५, ब्लॉक ३ – १२.०० ते १२.१५, ब्लॉक ४ – २.०० ते २.१५, ब्लॉक ५ – ३.०० ते ३.१५ आणि ब्लॉक ६ – ४.०० ते ४.१५ या दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक.