Friday, April 19 2019 11:47 pm

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आता धीम्या गतीने वाहन चालविता येणार नाही

ठाणे.दि.२७ :  यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगाची किमान मर्यादा निश्चित केली असून आता या मार्गावर ताशी ८० किमीपेक्षा कमी गतीने वाहन चालवता येणार नाही अशी अधिसूचना जारी केली आहे.

द्रुतगती मार्गावरील तीन लेनपैकी कार ,जीप, टॅम्पो या हलक्या वाहनांनी मार्गाच्या मध्य लेन मधून आणि जड अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनला लागून असलेल्या सर्वात डावीकडील लेन मधून तरकेवळ पुढील वाहनांस ओलंडताना(ओव्हरटेक) उजवीकडील लेनचा अवलंब करणे अपेक्षित आहे. इतर वेळी उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्यक आहे. उजवीकडील लेन ओव्हर टेकींगसाठी राखीव असल्याने पहिल्या लेनमधून प्रवास करताना आवश्यक असणारी  विहीत गती ताशी ८० कि.मी. वापर न करता त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालविली जातात त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या चालकांना वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असते असे पोलिसांच्या लक्षात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी त्याचप्रमाणे लेनच्या शिस्तीचे पालन व्हावे म्हणून वेगाच्या बाबतीत

 

किमान गती ठेवण्यासाठी ही अधिसूचना काढण्यात आली आहे.या अटीतून अत्यावश्यक सेवा वाहने,रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, पोलीस आणि शासकीय वाहने यांना वगळण्यात येत आहे असे अपर पोलीस महासंचालक वाहतूक आर.के. पदमनाभन यांनीकळविले आहे.