Monday, April 6 2020 1:15 pm

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल 18 टक्क्यांनी महागला

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. येत्या एक एप्रिलपासून टोलच्या दरामध्ये वाढ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे.  महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. तसंच टोल वसुलीचे अधिकार आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सला देण्यात आले आहेत. दर तीन वर्षांनी एक्स्प्रेसवेवरील टोलच्या दरात १८ टक्क्यांनी महागला होता, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने २००४ मध्येच काढली होती.

कोणत्या वाहनासाठी किती टोल?
– कारसाठी सध्या२३० रुपये टोल आकारला जातो.१एप्रिलपासून हा दर२७० रुपये होणार आहे.
– मिनीबससाठी३५५ रुपये घेतले जातात. नव्या दरानुसार आता४२० रुपये टोल भरावा लागणार आहे
– बससाठी६७५ रुपये टोल आकारला जातो. 1 एप्रिलपासून टोलसाठी७९७ रुपये मोजावे लागणार आहेत.
– ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या४९३ रुपये टोल घेतला जातो. १एप्रिलपासून हा टोल५८० रुपये होणार आहे
– क्रेन, अवजड वाहने तसंच टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या१५५५ रुपये टोल आकारला जातो. १एप्रिलपासून नव्या दरानुसार१८३५ रुपये टोल आकारण्यात येईल.