Saturday, April 26 2025 1:12 pm

मुंबई पालिका आयुक्त चहल यांची साडेचार तास ईडी चौकशी

मुंबई,१४ : कोरोना काळातील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवरुन मुंबई महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांची ईडी चौकशी सोमवारी तीन तास चौकशी झाली. कोविड जंबो सेंटरचे कंत्राट देत असताना अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांची ईडीने चौकशी केली आहे. चहल यांनी ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

चहल म्हणाले, “मुंबईतील लोकसंख्या एक कोटी चाळीस लाख इतकी होती. कोरोना काळात एकूण ११ लाख कोविड पॉझिटीव्ह झाले होते. मुंबईतील एकूण बेड्सची संख्या फक्त चार हजार इतकी होती. यावेळेत मुंबईसाठी तातडीने कोरोना काळात बेड्स उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. त्यामुळे महापालिकेतर्फे शासनाला या संदर्भातील विनंती करण्यात आली होती. मुलुंड जम्बो कोविड सेंटर, बीकेसी फेस १ आणि फेस २ जम्बो कोविड सेंटर, शीव, मालाड, कांजूरमार्ग, दहिसर आदी कोविड केंद्र ही मुंबई महापालिका वगळता इतर संस्थांनी बांधली होती. एमएमआरडीए, सिडको, मुंबई मेट्रो रेल आदी संस्थांनी ही बांधकामे केली होती. मुंबई महापालिकेला याचा खर्च शून्य आला होता. १५ हजार बेड होते. तसेच एक हजार आयसीयू बेड होते.”