Friday, February 14 2025 8:23 pm

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात

मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात माघारीअंती 21 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : अमोल गजानन कीर्तिकर (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मशाल), रवींद्र दत्ताराम वायकर (शिवसेना, धनुष्यबाण), राजेश रामकिसन मल्लाह (बहुजन समाज पक्ष, हत्ती), अरोरा सुरिंदर मोहन (भारत जनआधार पार्टी, कारंजा), परमेश्वर अशोक रणशूर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर), बाला वेंकटेश विनायक नाडर (आपकी अपनी पार्टी (पीपल्स) बॅटरी टॉर्च), भरत खिमजी शाह (हिंदू समाज पार्टी, ऑटो रिक्षा), मनोज श्रावण नायक (राइट टू रिकॉल पार्टी, प्रेशर कुकर), ॲड. मितेश वर्ष्णेय (भीमसेना, बासरी), सारिका डब्राल (इंडिया ग्रीन्स पार्टी, सफरचंद), हरिशंकर यादव (समाजविकास क्रांती पार्टी, विजेचा खांब), ॲडव्होकेट कपिल कांतिलाल सोनी (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), गजानन तुकाराम सोनकांबळे (अपक्ष, पाटी), रोहन साठोणे (अपक्ष, माईक), ॲड. लता पांडुरंग शिंदे (अपक्ष, टंकलेखन यंत्र), समीर मोरे (अपक्ष, भालाफेक), सुनील भिमा चव्हाण (अपक्ष, जहाज), सुषमा दयानंद मेहता (अपक्ष, खाट), ॲड. संजीवकुमार अप्पाराव कलकोरी (अपक्ष, शिट्टी), संतोष माणिक रायबान (अपक्ष, ट्रक), ह्दा धनंजय शिंदे (अपक्ष, पेनाची निब सात किरणांसह).