Tuesday, December 10 2024 6:51 am

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

ठाणे – 31 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेसह चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ पहाटे तीन-साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.