Tuesday, July 23 2019 2:50 am

मुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली !

मुंबई-: सध्या मुंबईमध्ये अनेक भीषण प्रकार पहावयास मिळत आहेत, रोजच्या रोज काहीनाकाही अपघात चालु आहेत. मुंबईमधील गोरेगावजवळ २ मजली इमारत कोसळली आहे. ही घटना सकाळी ८ ते ८.३० च्या सुमारास  घडली.

जखमींवर शेजारी असणाऱ्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या बचावकार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. या इमारतीचं बांधकाम कच्च्या स्वरूपाचं होतं, अशी माहिती आहे. त्यामुळे ही इमारत अनधिकृत असण्याचीही शक्यता आहे. पण अद्याप याबाबत प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.