Monday, March 8 2021 6:25 am

मुंबईत रिक्षा टॅक्सीची ३ रुपयांची भाडे वाढ

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे वाढते पेट्रोल, डिझेलच्या दर खासगी वाहन चालकांचा खिसा खाली करतायंत. यातच आता सर्वसामान्यांनाही बसणार आहे. कारण पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांनीही भाव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत भाडेवाढी संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ही भाडेवाढ १ मार्च २०२१ पासून लागू होईल. टेरिफ कार्डप्रमाणे भाडेवाढ घ्यावी लागेल. त्यामुळे २०२१ पर्यंत सर्व रिक्षा चालकांनी आपले टेरिफ कार्ड अपडेट करुन घ्यावे.

त्यामुळे १ मेपर्यंत रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी टेरिफ कार्ड अपडेट करावे लागणार आहे. तर १ जून पासून भाडे मीटरमध्ये दिसली पाहिजे अशी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे टॅक्सीचे भाडे २२ रुपये पर मीटरवरून २५ रुपये करण्यात आले आहे. आत्ताच्या नव्या भाडेवाढीप्रमाणे रिक्षाचे भाडे २ रुपये १ पैसे झाली तर टॅक्सीची भाडेवाढ २ रुपये ९ पैशांनी झाली आहे.

ही भाडेवाढ एमएमआरडीए व्हिजनसाठी असणार आहे.
खडवा समितीच्या निकषानुसार ही भाडेवाढ झाली आहे. या समितीत संघटनांचा समावेश असतो. त्यामुळे सर्व घटकांचा विचार करुन ही भाडेवाढ झाली आहे. सहा वर्षे भाडेवाढ झाली नाही. खूप वर्षापासून ही भाडेवाढ देय आहे. त्यामुळे ही भाडेवाढ मदत म्हणून दिली आहे.

रिक्षा, टॅक्सी चाकल समाजाचा एक घटक आहे. त्यामुळे सरकारने त्यांना मदतीचा एक हात देणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे शेअर रिक्षा भाडे संदर्भातही लवकरचं निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्च केले.