Wednesday, June 3 2020 10:51 am

मुंबईत दिवे लावून दिला ‘गो कोरोना गो’संदेश

 

मुंबई : मुंबईतील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावून ‘गो कोरोना गो..’ नारा दिला.तर, काही ठिकाणी ‘वंदे मातरम’च्या घोषणाही देण्यात आल्या.मागील काही दिवसांत मुंबईमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.या कोरोनाला हरविण्यासाठी मुंबईकरांनी घरोघरी दिवे लावून एकतेचा संदेश दिला.काही ठिकाणी ‘गो करोना’च्या घोषणा देऊन फटकेही फोडण्यात आले. सुरुवातीला विजेची उपकरणे बंद करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजून ९ मिनिटांनी दिवे लावण्याचे आवाहन केले होते.त्याला मुंबई , ठाणे तसेच कल्याण डोंबिवली करानी चांगला प्रतिसाद दिला.